संत नगाजी महाराज जयंती उत्सवासाठी वरुडमध्ये नाभिक समाजाची बैठक संपन्न २७ ऑक्टोबर रोजी जयंती उत्सव; नाभिक दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठ...
संत नगाजी महाराज जयंती उत्सवासाठी वरुडमध्ये नाभिक समाजाची बैठक संपन्न
२७ ऑक्टोबर रोजी जयंती उत्सव; नाभिक दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवून उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
वरूड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
संत नगाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी काल शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी नाभिक दुकानदार संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आगामी मंगळवार दि.२७ ऑक्टोबर २०२६ रोजी संत नगाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
जयंती उत्सवात तालुक्यातील सर्व नाभिक दुकानदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच उत्सवाच्या दिवशी सकाळपासून आपापली दुकाने बंद ठेवून कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. संत नगाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजाची एकजूट मजबूत करण्यासाठी हा उत्सव सामूहिक सहभागातून साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस नाभिक दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा संत नगाजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर, नाभिक युवा दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रितेश धानोरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, उद्धव घावरे, सुरेशराव बोरकर, महेंद्र तळखंडकर, शिक्षक रमेश आसोलकर, प्रविण सावरकर राजीव मिसळकर, सुधाकर धानोरकर, विश्वेश्वर धानोरकर, दीपक पापडकर, मोहन माथुरकर, रोशन इंगळे, विजय राऊत, पंकज कावलकर, नितीन जिस्कर, निलेश साखरकर, भालचंद्र चौधरी, अशोक साखरकर, नारायणराव दर्वेकर, बाबाराव इंगळे, फिरोज भाऊ, राजेश माथुरकर आदी उपस्थित होते.
उपस्थित सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी बैठकीत आपापली मते मांडून जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला उपस्थित राहून उत्सवाच्या नियोजनास सहकार्य केल्याबद्दल नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तथा संत नगाजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
---------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर
वरुड जि.अमरावती
---------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments