adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगीत महिलांनी केले हरितालिका पूजन महादेव मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजन; नवविवाहितांसह युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग

गलंगीत महिलांनी केले हरितालिका पूजन महादेव मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजन; नवविवाहितांसह युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग गलंगी, ता. चोपडा (वार्त...

गलंगीत महिलांनी केले हरितालिका पूजन

महादेव मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजन; नवविवाहितांसह युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग




गलंगी, ता. चोपडा (वार्ताहर) 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


गलंगी : येथील महादेव मंदिरात अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी पारंपरिक पद्धतीने हरितालिका पूजन केले. गावातील जवळपास सर्वच महिलांनी उत्साहाने या पूजनात सहभाग घेतला.

यावेळी ज्येष्ठ महिलांनी नवविवाहित तसेच विवाहित महिलांना हरितालिका पूजनाची विधिवत माहिती देत पूजेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. महिलांनी दिवसभर उपवास करून मनोभावे हरितालिका पूजन केले.

यासोबतच काही युवती व मुलींनीही उपवास करून हरितालिका पूजनात सहभाग घेतला. यामुळे महादेव मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून हरितालिकेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केले.

No comments