adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.सचिनकुमार नांदगुडे उत्कृष्ट कृषि शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानीत

डॉ.सचिनकुमार नांदगुडे उत्कृष्ट कृषि शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानीत जावेद शेख / राहुरी  (संपादक : हेमकांत गायकवाड) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण ...

डॉ.सचिनकुमार नांदगुडे उत्कृष्ट कृषि शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानीत




जावेद शेख / राहुरी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 54 व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषि शास्त्रज्ञ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन, अध्यापन, विद्यार्थी मार्गदर्शन आणि विविध कृषि विकासात्मक उपक्रमांतील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 डॉ. सचिनकुमार नांदगुडे हे डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी येथे मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि संशोधन कारकिर्दीत कृषि क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा कृषि शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सुमारे 25 वर्षांचा अनुभव असून त्यांनी विविध महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. डॉ. नांदगुडे यांनी परदेशातील नामांकित संस्थांमध्येही शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पोस्ट-डॉक्टोरल संशोधनासाठी नेब्रास्का-लिंकन विद्यापीठ, अमेरिका येथे कार्य केले असून, एम.टेक. व पीएच.डी. शिक्षण आयआयटी खरगपूर येथून पूर्ण केले आहे. त्यांच्या या उच्च शैक्षणिक पार्श्वभूमीचा उपयोग त्यांनी कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाला चालना देण्यासाठी केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संशोधन कार्य पूर्ण केले असून, पदव्युत्तर स्तरावर 40 आणि आचार्य पदवीसाठी 11 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या नावावर 76 एकूण संशोधन लेख, 12 प्रकाशित पुस्तके आणि प्रकाशित पुस्तकांमधील 3 अध्याय आहेत. तसेच त्यांनी 7 संशोधन प्रकल्पांचे मुख्य संशोधक आणि 1 प्रकल्पाचे सहसंशोधक म्हणून काम पाहिले आहे. कृषि क्षेत्रातील त्यांच्या संशोधनातून 23 शिफारशी, वाण, कृषि यंत्रे व अवजारे विकसित अथवा प्रसारित करण्यात योगदान मिळाले आहे.

 डॉ. नांदगुडे यांनी पूर्वी मिळविलेल्या 6 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्येही सहभाग नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचे नेतृत्व, तसेच परदेशातील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत त्यांनी कृषि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या नावावर 3 कॉपीराईट आणि पेटंट असून गोवा शासनाच्या राज्यातील कृषिविषयक बाबींवर तज्ज्ञ सल्लागार, नवसारी कृषि विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक समित्यांचे सदस्य तसेच हवामान-स्मार्ट पाणलोट क्षेत्र संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्थापना व विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. नांदगुडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments