adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कठोरा येथे विद्यार्थ्यांच्या हातून साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये कार्यशाळा संपन्न

कठोरा येथे विद्यार्थ्यांच्या हातून साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये कार्यशाळा संपन्न   कठोरा ता चोपडा ये...

कठोरा येथे विद्यार्थ्यांच्या हातून साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये कार्यशाळा संपन्न




 कठोरा ता चोपडा येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल मध्ये गणेशमूर्ती बनवितांना विद्यार्थीनी बनवलेले गणेशमूर्ती व बाजुला मुख्याध्यपक सुनील पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी


चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


कठोरा: ता चोपड़ा येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल मध्ये आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा येथे नुकतीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी निसर्गाला हानी पोहोचणार नाही अशा शाडूच्या मातीचा वापर केला. मुलांनी स्वतःच्या हाताने वेगवेगळ्या आकारांच्या अतिशय सुबक, सुंदर आणि मोहक गणेशमूर्ती साकारल्या. एवढेच नाही तर, मूर्ती तयार केल्यानंतर त्यांना पर्यावरणपूरक रंगांनी रंगकामही केले, ज्यामुळे मूर्ती अधिकच आकर्षक दिसत होत्या.

शाळेमार्फत नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, उपक्रमशील शिक्षक संदिप . अहिरे यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थ्यांना मातीपासून मूर्ती तयार करण्याचे तंत्र अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळाले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुण तर बाहेर आलेच, शिवाय पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

No comments