adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चोपडा येथे इंडक्शन प्रोग्राम उत्साहात साजरा

श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चोपडा येथे इंडक्शन प्रोग्राम उत्साहात साजरा  चोपडा प्रतिनिधी : रविंद्र कोळी  (स...

श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चोपडा येथे इंडक्शन प्रोग्राम उत्साहात साजरा 




चोपडा प्रतिनिधी : रविंद्र कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड) 

महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक), चोपडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय इंडक्शन व परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

संस्थेचे मा.अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व मा.सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणपद्धती, विद्यापीठाची कार्यप्रणाली, अभ्यासक्रम व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास तंत्रशिक्षण संचालनालय, विभागीय कार्यालय नाशिकचे सहा. संचालक डॉ. अमोल न्यायनीत, पोलीस उपअधीक्षक श्री. सुनील रामराव पाटील, संस्थेच्या सहसचिव डॉ. सौ. संध्या सोनवणे, प्रताप विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. जे. एस. शेलार व विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. जी. पाटील उपस्थित होते.

श्री. जे. एस. शेलार यांनी तंत्रशिक्षणातील संधींबाबत, तर पोलीस उपअधीक्षक श्री. सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सौ. संध्या सोनवणे यांनी अभ्यासाची योग्य पद्धत व शिस्तीचे महत्त्व सांगितले. डॉ. अमोल न्यायनीत यांनी तंत्रशिक्षणातील संधी तसेच परदेशातील उच्च शिक्षण व शिष्यवृत्तीबाबत माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक व प्रात्यक्षिक सुविधांचा पुरेपूर उपयोग करून कौशल्यविकास साधावा व उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन केले.कार्यक्रमामुळे विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठाची प्रणाली आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली. यावेळी अभियांत्रिकी विभागाचे उपप्राचार्य, समन्वयक सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments