adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*अंतुर्ली नगरीत गणेश विसर्जन आनंदमय वातावरणात संपन्न*

 *अंतुर्ली नगरीत गणेश विसर्जन आनंदमय वातावरणात संपन्न*   प्रतिनिधी. किरण धायले. (संपादक :- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथील...

 *अंतुर्ली नगरीत गणेश विसर्जन आनंदमय वातावरणात संपन्न*

 


प्रतिनिधी. किरण धायले.

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथील गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात डीजे लावून बँड पथक, लेझीम मंडळ, भजनी मंडळ यांनी विविध उपक्रम सादर करून गणेश उत्सवाचा आनंद लुटत सर्व बाल तरुण ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी सर्व समाजबांधव उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. 

    गणेश मंडळ  चावडीचा राजा , पाटीलवाडा गणेश मंडळ,सिद्धिविनायक गणेश मंडळ ठोंबरे वाडा, नवयुवक गणेश मंडळ, इंदिरानगर मधील गणेश मंडळ, तापिमाई गणेश मंडळ, विधाता गणेश मंडळ, छत्रपती शिवाजीनगर गणेश मंडळ, शिवपुत्र गणेश मंडळ,महेंद्र नगर व सर्व गावातील गणेश मंडळांनी व घरगुती गणपती विसर्जनाचा कार्यक्रम तापी माता नदीवर विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे पिंपरीनांदू नदी तीरावर विसर्जन आनंदमय वातावरणात झाले.

          याप्रसंगी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस निरीक्षक आशिष आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील साहेब व ठाणे अंमलदार पवन सपकाळ, पोलीस हवालदार विजय पढार , पो. कॉ. राजेश महाजन,पो . कॉ.अमोल जाधव, पो. कॉ.संदीप खवळे, पो.. कॉ. तायडे होमगार्ड विजय पाटील,कडू जिरी , सुनील घेटे, यांनी बंदोबस्त ठेवला.गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, समाज  बांधव बालगोपाल महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते.

No comments