बुलढाणा जिल्हास्तरीय बॅडमिंटन रँकिंग टूर्नामेंटचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न १२२ सहभागांसह खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद; विजेत्या खे...
बुलढाणा जिल्हास्तरीय बॅडमिंटन रँकिंग टूर्नामेंटचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
१२२ सहभागांसह खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद; विजेत्या खेळाडूंची ‘बुलढाणा जिल्हा संघात’ निवड
मलकापूर प्रतिनिधी अमोल बावस्कर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्दनार्शनाखाली 'बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा' यांच्या वतीने आयोजित अत्यंत मानाच्या ‘बुलढाणा जिल्हास्तरीय बॅडमिंटन रँकिंग टूर्नामेंट’चा पारितोषिक वितरण समारंभ १३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. १२ व १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी १२२ सहभागांसह आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.
सदर स्पर्धेच्या भव्य पारितोषिक वितरण समारंभाला श्री मनीष लखाणी (अध्यक्ष), हनुमान जगताप, ज्येष्ठ पत्रकार प्रा नितीन भुजबळ, राजेश्वर खांगार, असोसिएशनचे सचिव विजय पळसकर, बाबा खान सर आणि प्रा. कैलास पवार यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या निवड चाचणीतून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विजेत्या खेळाडूंची ‘बुलढाणा जिल्हा संघात’ अधिकृत निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू आगामी काळात पुणे येथे होणारी सब-ज्युनिअर राज्य स्पर्धा, चंद्रपूर येथील ज्युनिअर राज्य स्पर्धा आणि सातारा येथे होणाऱ्या मानाच्या सिनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम निकाल:
एकेरी निकाल:
मुलींची एकल U15: १. गुंजन माळी, २. संस्कृती संतोष अंधाळे
मुलांची एकल U15: १. शार्दुल जातकर, २. विवान वाघ, ३. अश्विन लड्डड, ३. श्रेयांशु साबळे
मुलींची एकल U13: १. समिधा कांबळे, २. स्वरा आंभोरे, ३. प्रांजल तांबडे, ३. दुर्गा घरमोडे
मुलांची एकल U13: १. पार्थ काळुसे, २. पार्थ पवार, ३. विग्नेश कचरे, ३. शाकेत मारम
मुलींची एकल U19: १. गायत्री मुळे, २. सिद्धी सलोक, ३. द्रुवी कुंभेफळकर
मुलींची एकल U17: १. श्रावणी नागलकर, २. स्वरा गवई, ३. द्रुवी कुंभेफळकर
मुलींची एकल U11: १. शिवान्या सरोदे, २. प्रार्थना त्यागी, ३. कृष्णाली कवलकर, ३. समीक्षा पवार
मुलांची एकल U9: १. हर्ष सरोदे, २. भावेश अग्रवाल
मुलांची एकल U19: १. नकुल गुजरे, २. श्रीलिन पवार, ३. वेदांत ठाकूर, ३. अभिषेक देशमुख
मुलांची एकल U17: १. स्वरूप सोनोने, २. प्रसाद पाटील
मुलांची एकल U11: १. राजवर्धन पाटील, २. ईशांत पाटील, ३. राजवीर जाधव, ३. कार्तिक नागरे
महिला एकल: १. अंजली तेलंग, २. गौरी बावने, ३. चेतना दीक्षित
पुरुष एकल: १. अतुल हाडे, २. परिक्षित कराले, ३. वरद हिंगे, ३. दुर्गेश खंडेलवाल
अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक ठरलेल्या या स्पर्धेत चीफ रेफरी दर्शन बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल वानखडे, अतुल हाडे, बाळू पाटील, विश्वजीत ठाकूर, गौरी बावणे, पृथ्वीराज थाटे, राजू शोल्क व वैष्णवी यांनी पंच म्हणून यशस्वी भूमिका बजावली.

No comments