adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.....

आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंतुर्लीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी किरण ध...

आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंतुर्लीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप



अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी किरण धायले) :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मा. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंतुर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेऊन अशा उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरला.
“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

No comments