जिद्द,मेहनत आणि क्रीडाकौशल्य दाखवत आदिवासी विद्यार्थ्यांनी गाजवल्या स्पर्धा;दोन दिवसीय सांघिक क्रीडा स्पर्धांचा समारोप चोपडा प्रतिनिधी (सं...
जिद्द,मेहनत आणि क्रीडाकौशल्य दाखवत आदिवासी विद्यार्थ्यांनी गाजवल्या स्पर्धा;दोन दिवसीय सांघिक क्रीडा स्पर्धांचा समारोप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : दिनांक २२ आणि २३ सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित चोपडा बीटस्तरीय सांघिक क्रीडास्पर्धा मनवेल तालुका यावल येथील अनुदानित आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडल्या.पाच
शासकीय व आठ अनुदानित आश्रमशाळांच्या जवळपास ९०० खेळाडू यांनी या दोन दिवसात स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेदरम्यान गोळाफेक, कबड्डी,खो-खो,हॉलीबॉल,हँडबॉल आदी क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी जोमाने सहभाग घेतला.मैदानावर विजयासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
१९ वर्षे वयोगटातील कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात सत्रासेन संघाने बाजी मारली तर सनपुले संघ उपविजय ठरला.
भाद्रपद महिन्यातील कडाक्याच्या उन्हात तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरावरील स्पर्धांसाठी निवड करण्यात आली. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेला आणि प्रतिभेला व्यासपीठ मिळत असून, त्यांच्यातील क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळत आहे.अशी भावना मनवेल येथील संस्थाअध्यक्ष हुकुमचंद पाटील यांनी व्यक्त केली.
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाने आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे यांच्या दैनंदिन उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, पवन पाटील तसेच स्थानिक मुख्याध्यापक सचिन पाटील, आलोने सर,सचिन पाटील क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक,पंच तसेच विविध आश्रमशाळांतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.
दोन दिवसांच्या या क्रीडा महोत्सवामुळे चोपडा बीट मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.पिण्याचे पाणी,निवास तसेच भोजन व्यवस्था उत्तम असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
“मैदानावर जिद्द, डोळ्यांत स्वप्न आणि विजयासाठी अथक प्रयत्न” असा संदेश देत आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडाप्रतिभेची दमदार झलक दाखवून दिली. प्रकल्पस्तरी क्रीडा स्पर्धेत निवड झाल्यामुळे अनेक शाळांचे संघ व्यवस्थापक यांनी समाधान व्यक्त केले आहे.



No comments