adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संग्रामपूर तहसीलवर दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी पेटवली, आज बैलगाड्या पेटवल्या,न्याय न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या पेटवनार ! प्रशांत डिक्कर,

  संग्रामपूर तहसीलवर दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी पेटवली, आज बैलगाड्या पेटवल्या,न्याय न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या पेटवनार ! प्रश...

 संग्रामपूर तहसीलवर दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी पेटवली,

आज बैलगाड्या पेटवल्या,न्याय न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या पेटवनार ! प्रशांत डिक्कर,






संग्रामपुर (प्रतिनिधी) 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, कापूस सोयाबीनचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष याविरोधात स्वराज्य पक्ष आक्रमक झाला आहे. संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पेटते सोयाबीन टाकून थेट बैलगाडी पेटवून देत तीव्र आंदोलन छेडले.

​या वेळी बोलताना प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "आज आम्ही आमचा 'बैल-बंड्या' पेटवून सरकारचा निषेध नोंदवला आहे. जर सरकारने तात्काळ आर्थिक मदत आणि न्याय दिला नाही, तर यापुढे मंत्र्यांच्या गाड्या पेटवू," असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची दुष्काळी मदत जाहीर करावी. शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य द्यावे.​ सरसकट कर्जमाफीसह थकीत पीक-विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.जिल्ह्यात दुष्काळामुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला असून, सरकारी अनास्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या आंदोलनामुळे संग्रामपूर परिसर हादरून गेला असून, सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन राज्यभर पेटण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे उज्वल चोपडे, विठ्ठल वखारे,मोहन पाटील, शिवम ईसापुरे,विशाल चोपडे,अमोल मारोडे, गौरव जळमकार, गणेश मानखैर, तुकाराम पाटील, गजानन आमझरै,विजय काळपांडे,नानाराव अरबट,विलास तराळे, धनंजय कोरडे सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

No comments