adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथे 'स्वच्छ भारत मिशन अभियानाचा उडाला फज्जा ? कागदावर स्वच्छता, प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग; नागरिकांकडून नाराजी. १५वा वित्त आयोगाच्या निधीतून नाला सफाईसाठी केला ८ लाखांचा खर्च!

मोठा वाघोदा येथे 'स्वच्छ भारत मिशन अभियानाचा उडाला फज्जा ? कागदावर स्वच्छता, प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग; नागरिकांकडून नाराजी. १५वा व...

मोठा वाघोदा येथे 'स्वच्छ भारत मिशन अभियानाचा उडाला फज्जा ?

कागदावर स्वच्छता, प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग; नागरिकांकडून नाराजी.

१५वा वित्त आयोगाच्या निधीतून नाला सफाईसाठी केला ८ लाखांचा खर्च!







रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


शासनाकडून स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावागावात स्वच्छता, ओला सुका घनकचरा कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असले, तरी मोठा वाघोदा गावात या अभियानाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच नाल्यांमध्ये कचरा साचल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बट्ट्याबोळ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

नियमित कचरा संकलन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, नाल्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल याकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी निर्माण होत असून, मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

स्वच्छतेसाठी शासनाकडून लाखों चा उपलब्ध करून दिला जातो सार्वजनिक आरोग्य स्वच्छता सोयी सुविधा व विविध योजना राबविल्या जात असतात मात्र मोठा वाघोदा येथे प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. केवळ जनजागृतीचे फलक लावून किंवा स्वच्छता मोहिमांचे फोटो काढून अभियान यशस्वी होणार नाही, तर नियमित सफाई देखरेख आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक आहे.

संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून कचरा हटवावा, नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करावी आणि स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष ठेवून जनसामान्यांच्या आरोग्य स्वच्छता सोयी सुविधा करीता योग्य विनियोग केला जातो आहे का याची ही तपासणी पाहणी करण्याची मागणी केली आहे

No comments