फैजपूरमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग इदू पिंजारी ...
फैजपूरमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात
इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर, दि. ४ सप्टेंबर २०२६ म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत शाडू मातीची गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत श्री. ललित भोरटक्के आणि श्री. आदित्य कस्तुरे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत स्वतः गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव घेतला.
ही कार्यशाळा शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर वाघुळदे, नगरपालिका फैजपूर तसेच संचालक, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, जळगाव यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली. कार्यशाळेस फैजपूरच्या नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ, उपनगराध्यक्ष श्री. विनोद चौधरी, शिक्षण सभापती श्री. महेंद्र मंडवाले तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. के. टी. तळले सर व पर्यवेक्षक श्री. एस. ओ. सराफ सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता आणि पारंपरिक कलेची आवड निर्माण होण्यास मदत झाली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

No comments