श्री अनंतराव सराफ विद्यालय,शेलापूरचे चार शिक्षक नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६ पुरस्काराने सन्मानित... अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत ...
श्री अनंतराव सराफ विद्यालय,शेलापूरचे चार शिक्षक नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६ पुरस्काराने सन्मानित...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर - नुकताच भ्रातृमंडळ मलकापूर येथे डॉ.सर्वपल्ली राधा कृष्णन जयंती शिक्षक दिनाचे औचित्य साधत डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया द्वारा श्री अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर येथील म.रा.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री एस आर सावळे सर, श्री एन जी इंगळे सर ,श्री एस वाय कवळे सर व श्री ए आर जोशी सर यांचा नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६ पुरस्काराने सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला.व्यासपीठावर मलकापूर नगर परिषदेचे शिक्षण सभापती मा.अशांत भाई वानखेडे,पद्म.कोलते इंजिनीरिंग कॉलेज चे प्राचार्य मा .श्री खर्चे सर,प्रेस क्लब च्या अध्यक्षा मा सौ.धनश्री काटीकर, सराफ विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री संजय सावळे सर उपस्थित होते..
नॅशनल आयकॉन पुरस्कार हा शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा ऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येत असल्याचे भाई अशांत वानखेडे यांनी आपल्या भाषणात सांगितले .तसेच सर्व पुरस्कारार्थिंचे अभिनंदन केले.


No comments