adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मान अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान

 जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मान अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान  अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...

 जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मान

अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान 


अमळनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमळनेर :-  शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ आदर्श शिक्षक बांधवांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, वरिष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे, किसान काँग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश पवार,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, मगन पाटील,रोहिदास दाजी, रज्जाक शेख,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमळनेर तालुक्याचे प्रा. हिरालाल पाटील यांचाही यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. हिरालाल पाटील हे वसंतनगर ता. पारोळा येथे गेल्या सोळा वर्षापासून जुनिअर कॉलेजला कार्यरत आहेत.त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जिल्हा काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष  जाधव, प्राचार्य के. आर. पाटील, मुख्याध्यापक आर. सी. चौधरी, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस पाटील यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. हिरालाल पाटील यांचे अभिनंदन केले.

No comments