श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी बीडवर विशेष कार्यक्रम बीड / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री संत सेनाजी महारा...
श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी बीडवर विशेष कार्यक्रम
बीड / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी बीड केंद्रातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात “श्री संत सेनाजी महाराज जीवन चरित्र” या विषयावर ह.भ.प. राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदीकर) यांचे ओवी निरूपण श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.
संत सेनाजी महाराजांचे जीवनकार्य, त्यांची भक्ती, समाजप्रबोधनाची परंपरा तसेच त्यांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व याविषयी या कार्यक्रमातून माहिती दिली जाणार आहे.
हा विशेष कार्यक्रम मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजता आकाशवाणी बीड केंद्रावरून १०२.९ मेगाहर्ट्झ एफ.एम. वर प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन गोपाल ठाकूर, तर सादरकर्ते आकाशवाणी बीडचे प्रसारण अधिकारी योगिराज बच्चे हे आहेत.
श्रोत्यांनी हा विशेष कार्यक्रम जरूर ऐकावा, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे यांनी केले आहे.हा कार्यक्रम जगाच्या कानाकोपऱ्यातून ऐकण्यासाठी NewsOnAir आणि WAVES OTT या मोबाईल ॲप्लिकेशनचाही उपयोग करता येईल.
---------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार सुनील
पोपळे - गेवराई जि.बीड
---------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111

No comments