यावल येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन यावल प्रतिनिधी भरत कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) यावल : शहरातील ...
यावल येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन
यावल प्रतिनिधी भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल : शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन करण्यात आले यात तब्बल ९७ श्री सदस्यांनी तीन ठिकाणी संकलन केंद्र उभारून तब्बल १५०० किलो निर्माल्य जमा केले.
गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जलप्रदूषण रोखणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने यावल शहरात शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या मोहिमेत एकूण १५०० किलोग्रॅम निर्माल्य संकलित करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी आणि आदरणीय डॉ. सचिन दत्तात्रेय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.गणेश विसर्जनानिमित्त भाविकांकडून विसर्जित होणारे निर्माल्य पाण्यात न टाकता त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी यावल येथे तीन प्रमुख ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्रे सुरू करण्यात आली होती यात प्रामुख्याने शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर समोरील श्री गोमुखाजवळ एक केंद्र तर यावल भुसावळ रस्ता हतनुकर कालव्याच्या पाटचारी जवळ एक केंद्र आणी यावल शेळगाव रस्ता पाटचारी जवळ असे तिन्ही संकलन केंद्रांवर प्रतिष्ठानच्या एकूण ९७ श्री सदस्यांनी उपस्थित राहून शिस्तबद्ध पद्धतीने निर्माल्य गोळा करण्याचे कार्य केले. दिवसभरात या तिन्ही ठिकाणांवरून एकूण १५०० किलो निर्माल्य जमा करण्यात आले. प्रतिष्ठानच्या या पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.-पुर्ण-फोटो आहे

No comments