सर्वधर्म समभावातून सामाजिक कार्याची दखल; सुमय्या अली यांचा भव्य सत्कार अकोला प्रतिनिधी अमोल बावस्कर (संपादक : हेमकांत गायकवाड) अकोला : दि. ...
सर्वधर्म समभावातून सामाजिक कार्याची दखल; सुमय्या अली यांचा भव्य सत्कार
अकोला प्रतिनिधी अमोल बावस्कर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अकोला : दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी मराठा मंडळ कार्यालय येथे दत्तात्रेय बँकेच्या वतीने आयोजित आमसभेत नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमय्या अली यांच्या सर्वधर्म समभावाच्या भावनेतून सुरू असलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सुमय्या अली या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. एड्स जनजागृती, लोकसंख्या नियंत्रण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व कपड्यांचे वाटप अशा विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.दिनदलित, गरीब, कष्टकरी कामगार, शोषित-पीडित नागरिक, युवक व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. गरजू रुग्णांसाठी अनेक वेळा रक्तदान करून त्यांनी मोलाची मदत केली आहे. कोरोना काळात गरजू रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच अपघात किंवा दुर्घटना घडल्यास जखमींना तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे.सर्वधर्म समभावाची भावना जोपासत ईद मिलन, दिवाळी मिलन, दसरा मिलन, गणेशोत्सव, दुर्गोत्सव यांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. तसेच पोलीस प्रशासनाला विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याचे कार्यही नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते.त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार, राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रीय संघर्ष नायक पुरस्कार, राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर गौरव पुरस्कार, महिला सन्मान पुरस्कार, विदर्भस्तरीय मातृशक्ती सन्मान पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.याच सामाजिक कार्याची दखल घेत आयोजित कार्यक्रमात आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते सुमय्या अली यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुमय्या अली यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीशभाऊ मुरूमकार होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरणराव सरनाईक, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, ॲड. मोतीसिंग मोहता, रामेश्वरजी फुंडकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, रवींद्र दाऱोकार, उमेशभाऊ टाले, श्यामभाऊ मते, शेख शाबीर शेख मुसा, दिगंबर घुईकर, ॲड. प्रवीण मुरूमकार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पिंजरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन लक्ष्मीकांत फाटे यांनी केले. कार्यक्रमाला महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सत्कारानंतर सुमय्या अली यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments