adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खामगाव सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : सुरजभैय्या यादव यांना 'फाउंडर मेंबर' व 'महाराष्ट्र रक्तवीर' सन्मान

खामगाव सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : सुरजभैय्या यादव यांना 'फाउंडर मेंबर' व 'महाराष्ट्र रक्तवीर' सन्मान   खामगाव तालुक...

खामगाव सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : सुरजभैय्या यादव यांना 'फाउंडर मेंबर' व 'महाराष्ट्र रक्तवीर' सन्मान

 


खामगाव तालुका प्रतिनिधी पल्लवी पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

खामगाव : सामाजिक कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या देशातील प्रतिष्ठित संस्था सोशल ॲक्टिव्हिस्ट वेलफेअर असोसिएशन ऑफ भारत (SAWAB) - नवी दिल्ली यांच्या वतीने बिहारच्या दरभंगा येथे मिथिला मीट-2026 (फाउंडर मेंबर्स समिट) चे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातून श्री. सुरजभैय्या यादव, खामगाव जि. बुलढाणा (महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य) यांना त्यांच्या उल्लेखनीय व निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेचे 'संस्थापक फाउंडर मेंबर' म्हणून विशेष सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.

याचबरोबर रक्तदान क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना 'महाराष्ट्र रक्तवीर' म्हणूनही विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

SAWAB चे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक कुमार महथा, एडव्होकेट श्री. गोपालसिंह पुरवा व श्री. नरेश शर्मा यांच्या हस्ते हात लावून हा गौरव प्रदान करण्यात आला. हा क्षण फोटोमध्ये कैद झाला आहे.

यावेळी अभयकुमार तेलतुंबडे, माधव सुवर्णकार, नंदकिशोर नळे, किशोर वासेकर, सरिता डाकरे, मंतोष मिश्रा, उज्वला पवार, सुरेश रेवणकर, मयुर काळे, योगेश घोडे, महाराष्ट्र टीम मेंबर आदी नवनियुक्त उपस्थित होते.

या राष्ट्रीय सन्मानामुळे खामगाव व बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अशी माहिती किशोर वासेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

No comments