adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महागाईला लगाम लावून रोजगार उपलब्ध करा अन्यथा "गर्जना शाखा"उतरेल रस्त्यावर जिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे दिवाळीचा गोडवा चाखू द्या..! जिल्हाधिकारी यांच्यातर्फे शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

महागाईला लगाम लावून रोजगार उपलब्ध करा अन्यथा "गर्जना शाखा"उतरेल रस्त्यावर जिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे  दिवाळीचा गोडवा चाखू द्या..!  ...

महागाईला लगाम लावून रोजगार उपलब्ध करा अन्यथा "गर्जना शाखा"उतरेल रस्त्यावर जिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे

 दिवाळीचा गोडवा चाखू द्या..! 

जिल्हाधिकारी यांच्यातर्फे शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी 



चोपडा प्रतिनिधी (संजीव शिरसाठ)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


वाढती महागाई कमी करा ! रोजगार देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या ! आजच्या घडीला महागाईचा भस्मासुर अनेकांचे जीवन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सत्ताधाऱ्यांनी वेळीच ध्यानी घेऊन जनतेला न्याय द्यावा अन्यथा जिल्हा गर्जना शाखेतर्फे जोरदार आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ सोनवणे यांनी दिला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयालाही निवेदनाची प्रत दिली आहे.

त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे की,गणपती उत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत.घरगुती आर्थिक बजेट कोलमडले असून, बेरोजगारीमुळे युवक व कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या वाढत्या महागाईमुळे केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराबाबत सर्वच घटकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन तातडीने खाद्यतेल, डाळी, तांदूळ, गहू, साखर, भाजीपाला, फळे, दूध तसेच फराळ व मिठाईसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर सर्वसामान्यांना परवडणारे ठेवावेत. साठेबाजी, काळाबाजार व कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन नवीन उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

महागाई कमी करा, रोजगार द्या आणि सर्वसामान्यांना दिलासा द्या. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; अन्यथा गर्जना शाखेच्या वतीने सर्वत्र तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठाम निर्धार जिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

निवेदनावर राजेंद्र चौधरी ( जिल्हा संघटक), संजय भाटिया (शहर संघटक) रायसिंग सोनवणे,सचिन सोनवणे, दिनेश पवार, सुनिल पाटील. कैलास दांडगे, ज्ञानेश्वर सोनवणे, नंदकिशोर गवळी, एकनाथ जाधव, सोपान लिहेकर राजेंद्र तायडे रोहीदास कुंभार, संजय शिंदे. सोपान माळी, बापू पाटील, इंजिनिअर असोसिएशनचे, युवक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

No comments