भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास; ...
भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड
शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास; विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते,जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,जिल्हा प्रभारी आ.अनुपभैय्या अग्रवाल,खासदार स्मिताताई वाघ,आमदार सुरेश भोळे (राजूमामा),आमदार मंगेश चव्हाण,डॉ.केतकीताई पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे,जिल्हा सरचिटणीस राकेशदादा पाटील,नगरसेवक नरेंद्र पाटील,गटनेता व नगरसेवक गजेंद्र जयस्वाल,नगरसेवक डॉ.रोहन पाटील,नगरसेविका संध्याताई महाजन,पूजाताई देशमुख तसेच नगरसेवक शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना व समस्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देणे तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय व धोरणे तळागाळातील शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता कमलेश पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर कमलेश पाटील हे शिक्षक आघाडीला अधिक बळकटी देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, कमलेश पाटील यांच्या निवडीबद्दल भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक बांधव तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments