adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर म्युनिसिपल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात श्री गणेशाची उत्साहात स्थापना

फैजपूर म्युनिसिपल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात श्री गणेशाची उत्साहात स्थापना फैजपूर इंदु पिंजारी  (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर : येथील...

फैजपूर म्युनिसिपल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात श्री गणेशाची उत्साहात स्थापना



फैजपूर इंदु पिंजारी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर : येथील म्युनिसिपल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात आज श्री गणेशाची मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. फैजपुर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री मिलिंद वाघुळदे व सौ. नीलिमा वाघुळदे यांच्या हस्ते विधिवत श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. के. टी. तळेले सर, पर्यवेक्षक श्री. एस. ओ. सराफ सर, शिक्षक, सर्व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त शाळेच्या परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

श्री गणेशाच्या स्थापनेनंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. गणरायाच्या आगमनाने शाळेच्या परिसरातही मोठा उत्साह पाहायला मिळाला.गणेश स्थापना सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

No comments