adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निमगव्हाण येथे गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एलडीसी जागृती कार्यक्रम फेरोमोन सापळ्यांच्या वापराचे प्रात्यक्षिक

  निमगव्हाण येथे गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एलडीसी जागृती कार्यक्रम फेरोमोन सापळ्यांच्या वापराचे प्रात्यक्षिक चौगाव ता चोपडा प्रतिनिधी :- ...

 निमगव्हाण येथे गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एलडीसी जागृती कार्यक्रम फेरोमोन सापळ्यांच्या वापराचे प्रात्यक्षिक


चौगाव ता चोपडा प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व शाश्वत पीक संरक्षण पद्धतींची माहिती साठी विठ्ठल जिनर्स व आफ्रो बीसीआय व एलडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने निमगव्हाण येथे जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला दोनशे शेतकरी उपस्थित होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन यांत्रिक व जैविक नियंत्रण पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

 कृषी सहाय्यक दिपाली ताठे यांनी गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र, पिकावरील प्रादुर्भावाची लक्षणे, नुकसानाची अवस्था आणि नियंत्रणाच्या विविध उपाययोजनांबाबत माहीती दिली. यावेळी धोकादायक कीटकनाशकांचा  वापर टाळणे बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

एलडीसी चे रिसर्च मॅनेजर मयूर झांजुर्णे यांनी एलडीसी कंपनीची तसेच कृषी क्षेत्र व कृषी व्यापारामधील कंपनीच्या योगदानाची माहिती शेतकऱ्यांना दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते फेरोमेन ट्रॅप चे वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमाला उप कृषी अधिकारी महेंद्र महाजन,सरपंच दिनेश सपकाळे यांच्यासह संबंधित अधिकारी, समन्वय समितीचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते. .....निमगव्हाण(ता चोपडा) शेतकऱ्यांना फेरोमेन ट्रॅप चे वाटप करतांना मान्यवर..

No comments