सार्वजनिक विद्यालय अडावद येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थीनी शिक्षक वर्गात विद्यार्थ्य...
सार्वजनिक विद्यालय अडावद येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थीनी शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकविताना
रविंद्र कोळी अडावद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद :- आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी भारताचे पहिले माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सार्वजनिक विद्यालयात साजरा करण्यात आला. शाळेची सुरुवातच विद्यालयातील विविध वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शिक्षकांऐवजी ज्ञानार्जनाचे काम करून केली आणि शिक्षक दिनाची धूरा सांभाळली. आज विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकाची व शिपाईची भूमिका पार पाडत तासिका घेतल्या, आणि अध्यापनाचे कार्य हे सोपे नसते हा अनुभव घेतला.
त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे मुख्यध्यापक अशोक कदम ,पर्यवेक्षक एम. जी. पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी माल्यार्पण केले. प्रतिमापूजनानंतर शिक्षक म्हणून आज शिक्षक दिनी कामकाज बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली, त्यात त्यांना अध्यापन करताना आलेले अनुभव, अध्यापनाचे कार्य, शिक्षकाची समाजातील भूमिका, विविध विषयांची काठीण्य पातळी यावर आपले विचार मांडले. नंतर विद्यालयातील शिक्षिका शुभांगी देशमुख आणि नलिनी पाटील यांनी शिक्षक दिनाविषयी मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कदम यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी केले, आभार सचीन पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी परीश्रम घेतले.
No comments