adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीयस्तर प्रशिक्षक .सुरेश पांडे यांच्याकडून शिक्षकांना आनंददायी अध्यापनाचे प्रशिक्षण

राष्ट्रीयस्तर प्रशिक्षक .सुरेश पांडे यांच्याकडून शिक्षकांना आनंददायी अध्यापनाचे प्रशिक्षण चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा ...

राष्ट्रीयस्तर प्रशिक्षक .सुरेश पांडे यांच्याकडून शिक्षकांना आनंददायी अध्यापनाचे प्रशिक्षण




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा : प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा जि. जळगाव येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी पुणे येथील प्रशिक्षक श्री. सुरेश पांडे सर यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणादरम्यान श्री. सुरेश पांडे सर यांनी विद्यार्थ्यांना हसत-खेळत आणि आनंददायी वातावरणात कशा पद्धतीने शिकवावे, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग वाढविण्यासाठी विविध कृती, खेळ, संवादात्मक पद्धती आणि मनोरंजक उपक्रमांचा वापर कसा करावा, हे त्यांनी प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले.

तसेच, अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, मानसिकता आणि त्यांच्या सक्रिय सहभागाचा विचार करून ‘Learning with Fun’ या संकल्पनेनुसार शिक्षण देण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींची माहिती मिळाली आणि वर्गातील वातावरण अधिक आनंददायी व प्रभावी करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळाली.

प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

No comments