विद्यार्थिनींसाठी ‘मेहंदी कला आणि अर्थार्जन’ उपक्रम उत्साहात संपन्न... जळगाव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव : नूतन मराठा कॉलेज,...
विद्यार्थिनींसाठी ‘मेहंदी कला आणि अर्थार्जन’ उपक्रम उत्साहात संपन्न...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : नूतन मराठा कॉलेज, जळगाव येथे युवती सभा २०२६-२७ आणि स्टुडंट सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी ‘मेहंदी कला आणि अर्थार्जन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शनिवार,१२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. विद्यार्थिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच मेहंदी कलेच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कौशल्याच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधता येते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेषतः मुलींनी आपल्या कलागुणांचे रूपांतर अर्थार्जनाच्या साधनात करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
हरतालिका तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यंदा हरतालिका तृतीया सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी असल्याने मेहंदी कलेला मोठी मागणी असते. या पारंपरिक सणाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना मेहंदी कलेचा अनुभव मिळावा आणि भविष्यात सण-समारंभांच्या माध्यमातून या कौशल्यातून उत्पन्न व रोजगाराच्या संधी निर्माण करता याव्यात, हा उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू होता.
विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध आकर्षक मेहंदी डिझाइन्स साकारल्या. उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला चालना मिळण्याबरोबरच कौशल्य विकास, आर्थिक स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.
नूतन मराठा कॉलेजच्या या उपक्रमाचे विद्यार्थिनी, प्राध्यापक व उपस्थितांनी कौतुक केले. नूतन मराठा कॉलेजच्या माननीय प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांनी भविष्यातही विद्यार्थिनींच्या कौशल्यांना रोजगाराशी जोडणारे विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

No comments