adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चौगाव किल्ल्याचे एक हजार वर्षांनंतर होणार सर्वेक्षण आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्राची दखल

  चौगाव किल्ल्याचे एक हजार वर्षांनंतर होणार सर्वेक्षण आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्राची दखल  विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- हेमकांत गायकव...

 चौगाव किल्ल्याचे एक हजार वर्षांनंतर होणार सर्वेक्षण आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्राची दखल 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : चोपडा तालुक्यातील मौजे चौगाव येथील पुरातन ऐतिहासिक चौगाव (विजयगड) किल्ल्याचा राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित कार्यालयाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

चौगाव (विजयगड) किल्ल्याच्या परिसरात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनकालीन वारशाच्या (लेण्यांच्या)खुणा असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. येथे नैसर्गिक लेणी, पाण्याच्या टाक्या, पुरातन नंदीचे हेमाडपंथी मंदिराचे अवशेष, सप्ततलाव समुह,गवळी वाड्यातील खोल्या तसेच पुरातन आई भवानी मंदिर आढळते.

किल्ल्याची भव्य आणि मजबूत तटबंदी, दोन प्रवेशद्वारे, अनेक बुरुज तसेच भुयारी मार्ग यामुळे या गडाला ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याचे आमदार सोनवणे यांनी म्हटले आहे. किल्ल्याजवळील त्रिवेणी संगम परिसरात श्री महादेव मंदिर तसेच उत्तर मराठा राजवटीशी संबंधित आणि इतर ऐतिहासिक अवशेषही आढळून येतात.

चौगाव किल्ल्याचा उल्लेख ब्रिटिशकालीन राजपत्रांमध्ये सन १८१८ ते १८८० या कालखंडात तसेच महाराष्ट्र राज्य जळगाव गॅझेटमध्ये असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंरक्षित ऐतिहासिक स्मारकांचे सर्वेक्षण करून त्यांचा राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश दि .७/१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महावारसा समितीच्या इतिवृत्तात असल्याने चौगाव किल्ल्याचाही या प्रक्रियेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौगाव किल्ला यावल वनविभागातील चोपडा तालुक्यातील कक्ष क्रमांक २५८ मध्ये येत असला, तरी वन विभागाच्या हद्दीतील सालेर, मुल्हेर व वासोटा किल्ल्यांच्या धर्तीवर त्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी भूमिका आमदार सोनवणे यांनी मांडली आहे. आगामी ऐतिहासिक वारसा समितीच्या बैठकीत या मागणीचा सकारात्मक विचार करून चौगाव (विजयगड) किल्ल्याचा राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. आमदारांच्या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव सौरिष सहाय्य व नाशिक विभागीय पुरातत्व अधिकारी अमोल गोटे यांना आदेशित केले होते.अमोल गोटे यांनी अधिक्षक भूमी अभिलेख चोपडा, तहसीलदार चोपडा व वनक्षेत्रपाल चोपडा यांच्या कडून चौगाव किल्ल्याची महसुली माहीती मागवली होती.ती गेल्या आठवड्यातच नाशिक विभागीय पुरातत्व अधिकारी अमोल गोटे यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.आता त्या माहीतीची तपासणी करून चौगाव किल्ल्याचे तब्बल एक हजार वर्षांनंतर वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग व भूमी अभिलेख चोपडा यांच्या मार्फत संयुक्त सर्वेक्षण होणार आहे.व त्यानंतर चौगाव किल्ला राज्य संरक्षित स्मारक घोषित होणे बाबत सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या कडे मंजूरीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

    तसेच चौगाव किल्ल्यासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,शासन निर्णय क्रमांक:टिडीएस २०२५ /१०/प्र क्र १७१ /पर्यटन -१ दि.२८ आक्टोंबर २०२५ रोजी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.नुकतेच उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव या यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहेत.

No comments