गणेशोत्सवात गुलालाचे पावित्र्य जपा गुलालाऐवजी गुलाब पाकळ्यांची उधळण करा - संदीप गावीत एएसपी. कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाह...
गणेशोत्सवात गुलालाचे पावित्र्य जपा गुलालाऐवजी गुलाब पाकळ्यांची उधळण करा - संदीप गावीत एएसपी.
कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, सपोनी गणेश फड
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल मध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
बैठकीसाठी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित व मुक्ताईनगर चे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील,ह साहेब पोलीस निरीक्षक गणेश फड महावितरणचे गणेश महाजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाविस्कर, उपनिरीक्षक राहुल सानप सावदा नगराध्यक्षा यांची उपस्थिती होती
या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी गणेश भक्तांना श्री गणेश आगमन अथवा विसर्जन मिरवणूक काढते समय मिरवणुकीत गुलाबाची उधळण केली जाते मात्र श्रीगणेश भक्तांनी गुलालाचे पवित्र जपून गुलाला ऐवजी गुलाब पाकळ्यांची उधळण करण्याचे आवाहन उपस्थित गणेश मंडळांना यावेळी केले यासोबतच गणेश मंडळांनी आपल्या मंडळाची देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे यासोबतच मिरवणूक दरम्यान वाजविले जाणारे गाण्यांनी इतर धर्मीयांच्या भावना दुखावणार नाही याचीही काळजी घ्यावी तसेच गणेश मंडळांनी व्यसनमुक्तीसाठी ज कार्यक्रम आयोजित करून प्रचार प्रसार व जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले
दरम्यान सावदा पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी सन उत्सव साजरे करताना कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असावे जो कोणीही कायदा मोडण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणाचीही आहे काय केली जाणार नसल्याचे ते म्हणाले
सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी व्यासपीठावर पोलीस प्रशासनासह महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित असताना नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत सावदा पोलीस स्टेशन हद्दीत आजतागायत सर्व धर्मीयांचे सण उत्सव साजरे होत असताना अद्यापही कुठेही गालबोट लागले नसल्याचे सांगत सर्व धर्मीय समाज बांधव सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने एकत्रितपणे साजरे करत असल्याचे मनोगतात सांगितले लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रेणुका पाटील
माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी असलम सर महावितरणचे गणेश महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार बांधव, गणेश मंडळचे पदाधिकारी व हिंदु व मुस्लिम समाजाचे लोक तसेच शांतता कमिटीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, सर्व पोलीस पाटील, मुस्लिम पंच कमिटी उपस्थित होते.सुत्रसंचालन पाटील सर यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांनी मानले


No comments