adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विज्ञान नाट्योस्तव स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विज्ञान नाट्योस्तव स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा :...

पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विज्ञान नाट्योस्तव स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शिक्षण विभाग पंचायत समिती, चोपडा आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत तालुकास्तरावर "ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) - शत्रू की मित्र?" या विषयावर अप्रतिम नाटिका सादरीकरण करत जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

अनुसयाबाई सभागृह चोपडा येथे संपन्न झालेल्या या नाटयोत्सवात 'विज्ञान आणि समाज' या मुख्य संकल्पनेवर (चार उपविषयांवर आधारित) आधारित या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 14 शाळांचे संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. संदीप भास्कर पाटील (चोपडा महाविद्यालय) आणि श्री. किशोर पाटील (कुरवेल) यांनी काम पाहिले. या स्पर्धेत पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या चमूने "कृत्रिम बुद्धिमत्ता मित्र, साधन की धोका"

या विषयावर नाटिका सादर केली. नाटिका मध्ये सुधीक्षण सतीश पाटील, पार्थ प्रमोद जाधव,दिव्या विजय माळी, गार्गी दिलीप पाटील, युक्ती अतुल महाजन, प्रथमेश जगदीश पाठक, श्रेयस किरण पाटील, भार्गवी चंद्रशेखर पाटील यांनी अप्रतिम सादरीकरण करत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरासाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका विजया पाटील , परमेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हास्तरावर पात्र ठरलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी अजित पाटील , संस्थाध्यक्ष पंकज बोरोले, संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, सर्व संचालक , मुख्याध्यापक व्ही आर पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले

पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या चमूने सादर केलेल्या नाटिकेचे तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष श्री. संजय हरी पाटील, सचिव श्रीमती विजया पाटील, सहसचिव श्री. निलेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख श्री. रुपेश नेवे, सदस्या श्रीमती एस. एम. चौधरी व तालुक्यातील विज्ञान शिक्षक यांनी कौतुक केले.

No comments