adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी

यावल शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी यावल प्रतिनिधी भरत कोळी  (संपादक : हेमकांत गायकवाड)  यावल शहरातील विविध...

यावल शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी




यावल प्रतिनिधी भरत कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 यावल शहरातील विविध प्रभागांमध्ये सन २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर निवासी वापरासाठी असलेल्या घरांबाबत अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक तथा यावल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक हेमराज जगन्नाथ फेगडे यांनी यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील विविध भागांमध्ये अनेक नागरिकांची घरे सन २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अस्तित्वात असून, या जागांचा वापर अनेक वर्षांपासून निवासी कारणांसाठी केला जात आहे. या घरांमध्ये गरीब, मध्यमवर्गीय तसेच गरजू नागरिक आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

संबंधित नागरिकांकडे दीर्घकाळापासून वास्तव्याचे पुरावे, घरपट्टी अथवा मालमत्ता कराच्या पावत्या, वीज जोडणी तसेच इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र शासकीय जमीन असल्यामुळे त्यांच्या निवासी अतिक्रमणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

या नागरिकांना त्यांच्या घराबाबत सुरक्षितता मिळावी तसेच मालकी हक्क अथवा नियमितीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी सन २०११ पूर्वीपासून नागरी भागातील शासकीय जमिनीवर असलेली पात्र निवासी अतिक्रमणे शासनाच्या प्रचलित नियम व धोरणानुसार नियमित करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित प्रकरणांची पाहणी करून पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे घेण्यात यावीत. जागेची मोजणी व पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय या संदर्भात आवश्यक असल्यास शहरातील नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करून अर्ज स्वीकारण्याची व मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे

No comments