adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात 'कहीं खुशी, कहीं गम ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर

  चोपडा तालुक्यात 'कहीं खुशी, कहीं गम ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर Ai निर्मित काल्पनिक फोटो   मच्छिंद्र रायसिं...

 चोपडा तालुक्यात 'कहीं खुशी, कहीं गम

ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर

Ai निर्मित काल्पनिक फोटो 

मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा :  तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली. सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, तसेच कोणती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार, याची घोषणा करण्यात आली. आरक्षण सोडत जाहीर होताच गेल्या काही दिवसांपासून सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये कुठे उत्साह, तर कुठे निराशा असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


तालुक्यातील एकूण ७९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी २७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ६, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


अनुसूचित जातीसाठी आरक्षण


अनुसूचित जातीच्या सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये मितावली, हातेड खुर्द, मंगरूळ आणि चहार्डी यांचा समावेश आहे.


अनुसूचित जमातीसाठी आरक्षण


अनुसूचित जमातीच्या सरपंचपदासाठी चांदसनी, खाचणे, मामलदे, मजरे हिंगोणे, काजीपुरा, मजरेहोळ, मोहिदे, कुरवेल, गोरगावले खुर्द, देवगाव, रूखनखेडा, पुनगाव, कोळंबा, सुटकार, गलंगी, बीडगाव, भवाळे, विरवाडे, वराड, वरगव्हाण, पिंपरी, तावसे खुर्द, विटनेर, माचले, निमगव्हाण, लोणी आणि वटार या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.


नागरिकांचा मागास प्रवर्ग


नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कुसुंबे, अनवदें बुद्रुक, अकुलखेडे, भोकरी खेडी, अनवर्दे खुर्द आणि वेळोदे या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.


सर्वसाधारण प्रवर्ग


सर्वसाधारण प्रवर्गासाठी हातेड बुद्रुक, मौजे हिंगोणे, दगडी बुद्रुक, विचखेडे, धुपे खुर्द, दोंदवाडे, वेले, आखतवाडे, मालखेडे, धनवाडी, गोरगावले बुद्रुक, गलवाडे, चुंचाळे, गणपूर, आडगाव, कमळगाव, धुपे बुद्रुक, नागलवाडी, कठोरा, वढोदा, चौगाव, घोडगाव, वडती, गरताड, अजंतीसीम, बुधगाव, घाडवेल, तांदलवाडी, तावसे बुद्रुक, सनफुले, वडगाव बुद्रुक, अडावद, खडों, पंचक, धानोरा प्र. पारगाव, अंबाडे, वाळकी, खडगाव आणि नरवाडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


सदर आरक्षणाची घोषणा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केली. आरक्षण सोडतीनंतर आता विविध गावांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

No comments