adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बैलपोळा सण उत्साहात साजरा सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर

बैलपोळा सण उत्साहात साजरा सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर   मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतीश गायकवाड  (संपादक : हेमकांत गायकवा...

बैलपोळा सण उत्साहात साजरा

सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर




 मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतीश गायकवाड 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर, दि. ११ सप्टेंबर २०२६ : सौ.तु.ल.कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, ग्रामीण जीवनपद्धती, शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन श्रीमती सुरेखा मुंडके मॅडम यांनी केले.

कार्यक्रमासाठी बैलांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. शाळेमध्ये प्रत्यक्ष बैल आणून बैलांचे औक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. बैलांच्या शिंगांना रंग देऊन तसेच फुलांच्या माळा, रंगीबेरंगी सजावटीने त्यांना सजविण्यात आले. शाळेच्या प्रांगणात बैलांची विधिवत पूजा, आरती व औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांना ‘बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती आहे’ याची जाणीव करून देण्यात आली. शेतीची कामे, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे असलेले महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच प्राणीमात्रांवर प्रेम करावे, त्यांची काळजी घ्यावी आणि आपल्या पारंपरिक सण-उत्सवांचे जतन करावे, असा संदेश देण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून आपल्या संस्कृतीची ओळख झाली. शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या उपक्रमाचे शाळेच्या चेअरमन ॲड.रोहिणी ताई खडसे खेवलकर, सचिव सी. एस. चौधरी, श्री.नारायण चौधरी तसेच स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरांची माहिती देणारे तसेच शेती आणि शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण करणारे असे उपक्रम शाळेत सातत्याने राबवावेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पारंपरिक संस्कृती, शेती आणि प्राणीप्रेमाचा सुंदर संगम घडवून आणणारा हा बैलपोळा उत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

No comments