एकीकडे सेवा तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी कडून एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनची प्रशंसा खामगाव तालुका प्रीतीनिधी (...
एकीकडे सेवा तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी कडून एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनची प्रशंसा
खामगाव तालुका प्रीतीनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
खामगाव - जळगाव जामोद येथील आदिवासी गरीब कुटुंबातील १२ वर्षीय चिमुकला गणेश जामरा हा महात्मा फुले सामान्य रुग्णालय, खामगाव येथील २ नंबर वार्डात भरती होता. त्याचे हिमोग्लोबिन अवघे ४ पॉईंटपर्यंत खाली आले होते. त्याला दुर्मिळ a b - निगेटिव्ह रक्तगटाच्या ४ रक्तदात्यांची तातडीने गरज होती. दुर्मिळ रक्तगट उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरांनी त्याला अकोला येथे रेफर केले होते.
याची माहिती गजानन शेटे सर यांनी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव यांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच फाउंडेशनने तात्काळ धाव घेतली.
रक्तदात्यांनी वाचवला जीव:
फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत सचिन कळसकार, आशिष निळे, विजय राखोंडे, वैभव बाळापुरे, चेतन शेलकर, सिद्धेश चिंचोळकर या एकनिष्ठा दुर्मिळ रक्तदात्यांनी पुढाकार घेत गणेशचा जीव वाचवला.
याचसोबत आणखी दोन गरीब कुटुंबातील महिलांना रक्त व औषधीसाठी आर्थिक मदत करण्यात आली, तसेच प्रसूतीसाठी भरती असलेल्या एका दुर्मिळ a ➖Ve, 🅱️➖Ve, ⭕➖Ve रक्तगटाच्या महिलेला निःशुल्क रक्ताची मदत करण्यात आली.
पोलीस प्रशासनाकडून कौतुक:
फाउंडेशनच्या या अखंडित सामाजिक कार्याची दखल घेत खामगाव येथील मानाचा लाकडी गणपतीची आरती करण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी आलेले बुलढाणा पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रदीप पाटील साहेब यांनी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे विशेष कौतुक केले.
"तुमचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे, पोलीस प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी सुरजभैय्या यादव यांनी एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

No comments