adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा येथील माधुरी वाणी यांना पी एच डी पदवी प्रदान!

सावदा येथील माधुरी वाणी यांना पी एच डी पदवी प्रदान! सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक : हेमकांत गायकवाड) मुंबई येथे शिक्षण क्षेत्रात कार्...

सावदा येथील माधुरी वाणी यांना पी एच डी पदवी प्रदान!



सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मुंबई येथे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सावदा तालुका रावेर येथील माधुरी राजेंद्र वाणी यांनी ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जैवभार कार्बन शोषण व साठवण क्षमतेचा अभ्यास’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सावदा तसेच मुंबई परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.सर्वोत्तम कॉलेज निवडा


माधुरी वाणी या मुंबईतील माटुंगा येथील खालसा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. पर्यावरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेत त्यांना नुकतीच डॉक्टर पदवी बहाल करण्यात आली. पुणे विद्यापीठाकडून त्यांना ही पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

त्यांच्या पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेचे परीक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सोपान इंगळे यांनी केले.


डॉ. माधुरी वाणी या सावदा येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुमनबाई निंबराज बढे यांच्या कन्या असून, पी. टी. वाणी सर यांच्या स्नुषा आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना पर्यावरणविषयक संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी मिळविलेले हे यश सावदा परिसरासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.


डॉ. माधुरी राजेंद्र वाणी यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments