पेनी स्टॉक्स'वरील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी विपिनकुमार मिश्रा यांना पीएचडी प्रदान मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली...
पेनी स्टॉक्स'वरील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी विपिनकुमार मिश्रा यांना पीएचडी प्रदान
मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चौगाव येथून जवळच असलेल्या गणपूर ता चोपडा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, अंतर्गत चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील पदव्युत्तर वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र येथील नोंदणीकृत विद्यार्थी विपिनकुमार कैलाशनाथ मिश्रा यांना 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' (Ph.D.) ही पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. विपिनकुमार मिश्रा यांनी आपला संशोधन प्रबंध बीएसईवरील मायक्रो-कॅप पेनी स्टॉक्समधील जोखीम आणि परताव्याचे विश्लेषण या विषयावर यशस्वीरीत्या पूर्ण केला.
वाणिज्य आणि व्यवस्थापन या आंतरविद्याशाखीय क्षेत्रांमधील 'लेखांकन' या व्यापक विषयांतर्गत हे संशोधन येते.हे संशोधन कार्य त्यांनी दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील संशोधन केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत रभाजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
संशोधनाचे महत्त्व व शैक्षणिक पार्श्वभूमी:
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वरील मायक्रो-कॅप कंपन्यांशी संबंधित आर्थिक निकष आणि पेनी स्टॉक्समधील प्रचंड परताव्याची शक्यता व त्यातील उच्च जोखीम यांच्यातील समतोलाचा सखोल अभ्यास डॉ. मिश्रा यांनी केला आहे. डॉ. विपिनकुमार मिश्रा हे स्वतः पात्र 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट', एम.कॉम, आणि 'यूजीसी नेट' उत्तीर्ण संशोधक असून त्यांना लेखांकन, वित्त व शेअर बाजाराचा प्रदीर्घ व्यावहारिक अनुभव आहे.
पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. मिश्रा यांनी आपले मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत देवरे, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे सर्व उपप्राचार्य, समन्वयक व सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

No comments