adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’ लोककलेचा भव्य सांस्कृतिक सोहळा

अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’ लोककलेचा भव्य सांस्कृतिक सोहळा अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा (संपादक : हेमकांत गायकवाड) महारा...

अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’ लोककलेचा भव्य सांस्कृतिक सोहळा




अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा

(संपादक : हेमकांत गायकवाड)


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने तसेच ‘गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा’ मिळाल्यानिमित्त ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या भव्य लोककला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

सुनील ढगे प्रस्तुत ‘पुष्पराज थिएटर्स’ निर्मित या कार्यक्रमामध्ये तब्बल 50 कलावंत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणार आहेत. गण, गवळण, मुजरा, लावणी, कोळी गीत, लोकगीत, शाहिरी गीत, महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांवर आधारित लोकनृत्य अशा विविध लोककलांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक लोककला, लोकसंगीत आणि लोकनृत्य यांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर तसेच आशिष शेलार, मंत्री, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र शासन व मुंबई शहराचे पालकमंत्री यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. प्रशांत संगीत कैलास खेडेकर, मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच डॉ. पंकज आशिया, मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

अहिल्यानगरमधील नागरिकांनी व रसिकांनी या विनामूल्य लोककला महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : माऊली सभागृह, अहिल्यानगर

दिनांक : शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026

वेळ : दुपारी 12 वाजता

प्रवेश : विनामूल्य


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments