adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला! डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले! ग्रामपंचायतीने औषध फवारणी करण्याची मागणी

  मोठा वाघोदा येथे  डासांचा प्रादुर्भाव वाढला!  डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले! ग्रामपंचायतीने औषध फवारणी करण्याची मागणी रावेर प्रतिनिधी मुबा...

 मोठा वाघोदा येथे 

डासांचा प्रादुर्भाव वाढला!

 डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले!

ग्रामपंचायतीने औषध फवारणी करण्याची मागणी



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील साफसफाई अभावी गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे गटारी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू मलेरिया सदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत नियमित साफसफाई होत नसल्याने रोगराईला निमंत्रण दिले जात आहे सर्दी खोकला ताप अंगदुखी सारख्या आजाराचे प्रमाण वाढतांना दिसत आहेत लहान मोठे वयस्कर रुग्णांचा खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्ण धाव घेत आहेत 

मलेरिया डेंग्यूचा प्रादुर्भाव निर्मुलनासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने डास नियंत्रण व निर्मुलनासाठी जंतूनाशक पावडर व औषध फवारणी करण्याची मागणी केली आहे 

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे साफ सफाई अभावी गावातील विविध भागांतील गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, काही नागरिक स्वतःहून गटारींची साफसफाई करून घेत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे रोजंदारीवर सफाई कामगारांकडून गटारींची साफसफाई करण्याचे काम केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गावातील गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचल्याचे दिसून येत आहे. गावातील मुख्य चौकांत ठिक ठिकाणी कचर्याचे ढिग साचलेले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे व या कचर्याचे ढिगारे व गटारीत साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात झाली आहे व डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . काही काळापूर्वी अशाच प्रकारे दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची ची लागण झाली होती व २००च्या वर बाधित रुग्णांची संख्या पोहचली होती चक्क महिनाभर जिल्हा तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ठाण मांडून गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले होते त्याचप्रमाणे गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे व डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांची ही संस्था दिवसेंदिवस वाढतच आहेत तरी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन डास नियंत्रण व निर्मुलनासाठी गटारींची नियमित साफसफाई करावी व किटक नाशक औषधे व धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

No comments