adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत शांततापूर्ण तणाव

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत शांततापूर्ण तणाव इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) येथून जवळच असलेल्या न्हावी...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत शांततापूर्ण तणाव




इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


येथून जवळच असलेल्या न्हावी गावात गणपती मिरवणूक पाहण्यासाठी महादेव वाडा परिसरात उभ्या असलेल्या एका सोहळा वर्षीय मुलीला युवकाने लाथा बुक्क्याने 

मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील न्हावी गावातील चौधरी नामक व्यक्तीची सोहळा वर्षीय मुलगी गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेव वाडा येथे उभी होती. त्यावेळी एका व्यक्तीने (वय 30 ) याने कोणतेही स्पष्ट कारण नसताना तिच्याशी वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण येथील मुलगी बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने भुसावळ येथे लोकेशन येथे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहे दरम्यान घटनेनंतर सदरील व्यक्तीलाही जमावाकडून मार लागण्याची माहिती आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून 

स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले त्यानंतर मिरवणूक शांततेत मार्गस्थ करण्यात आली संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले दरम्यान या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. घटनेबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे मारहाणीचे नेमके कारण घटनेतील वस्तुस्थिती आणि पुढील पोलीस कारवाईबाबत अधिकृत नोंदीनंतरच स्पष्टता येणार आहे. मात्र दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली.

No comments