adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथील गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार

चोपडा येथील गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार चोपडा प्रतिनिधी : रविंद्र क...

चोपडा येथील गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार





चोपडा प्रतिनिधी : रविंद्र कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा शहरातील श्री गणेश उत्सवाची मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत नियोजनबद्ध पोलीस बंदोबस्त तैनात केल्याबद्दल चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा चोपडा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांची मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून बंदोबस्ताची आखणी केली होती. सर्व समाजघटकांमध्ये सलोखा व शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.

काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा गणेश मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान हातात काठी घेऊन मंडळासोबत पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या व्हिडिओबाबत सत्कारप्रसंगी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गणेश मंडळाला मान-सन्मान देत मिरवणूक व्यवस्थित पुढे जावी आणि शिस्तीत पार पडावी, या उद्देशाने पोलीस निरीक्षक देसले हे मंडळासोबत पुढे जात होते.

पोलीस निरीक्षक पवन देसले हे शहरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करतात. कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना समान वागणूक देत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे कामकाज सुरू असल्याचे मुस्लिम समाजातील मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

“कोणत्याही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यापूर्वी प्रत्यक्ष वस्तुस्थिती व ग्राउंड रिअलिटीची खात्री करूनच माहिती प्रसारित करावी,” असे आवाहन चोपडा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

No comments