फैजपूर तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न इदू पिंजारी फैजपुर (संपादक : हेमकांत गाय...
फैजपूर तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर, दि. २३ सप्टेंबर २०२६ शासनाच्या आदेशानुसार तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या निर्देशानुसार धनाजी नाना महाविद्यालय, येथे विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य तपासणीमध्ये एफ.वाय.बी.ए., एफ.वाय.बी.कॉम., एफ.वाय.बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. तसेच बी.सी.ए. या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. नितीन पाटील, डॉ. उमेश चौधरी, डॉ. सुनील पाटील, डॉ. भरत महाजन आणि डॉ. भाग्यश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मच्छिंद्र बी. पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वैद्यकीय तपासणीचे नियोजन व आयोजन आरोग्य सेवा समितीचे प्रमुख डॉ. शेरसिंग पाडवी, डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. विवेक महाजन आणि प्रा. विवेक श्रावगे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, आजारांचे प्राथमिक स्वरूपात निदान तसेच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले.

No comments