रावेर शहरात दिवसा बंद घराचे कुलूप तोडुन घरफोडी करणाऱ्या आरोपींना रावेर गुन्हे शोध पथकाने २४ तासांत केले जेरबंद रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी ...
रावेर शहरात दिवसा बंद घराचे कुलूप तोडुन घरफोडी करणाऱ्या आरोपींना रावेर गुन्हे शोध पथकाने २४ तासांत केले जेरबंद
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशनला दाखल घरफोडी तक्रार अशी की दि. २०/०९/२०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गुरंनं ४३०/२०२६ भा. न्या. संहीता कलम ३०५, 339(3), 3 (५) प्रमाणे घरफोडी चा गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी कल्पना सुभाष वाणी वय-६२ व्यवसाय- अंगणवाडी सेवीका रा. मधुसुदन मेडीकल समोर जुनी नगरपालीका रोड रावेर येथे राहणाऱ्या या नेहमीप्रमाणे दि. ११/०९/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजता घराला कुलुप लावुन अहीरवाडी येथे त्यांच्या कामानिमीत्त गेल्या होत्या. फिर्यादी हया दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास घरी परतल्या असता त्यांना घरातील सामान हा अस्तावस्त स्थितीत पडलेला दिसला व घराच्या मागील दरवाजाचे कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसत होता. त्यांनी घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तुंचा शोध घेतला असता त्यांना घरातील ५०,०००/- रुपये रोकड, ०२ तोळयाचे सोन्याचे लॉकेट, ०२ सोन्याच्या प्रत्येकी ०५ ग्रॅमच्या अंगठया हया चोरीस गेल्याचे समजले होते.
वरील फिर्यादी हया मागील काही काळापासुन घरात एकटयाच वास्तव्यास होत्या. रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होताच रावेर पोलीस स्टेशनचे पो.नि. संदीप पाटील यांनी रावेर गुन्हे शोध पथकास सुचना देवुन तात्काळ एक पथक रावेर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याकरीता रवाना करण्यात आले होते. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असतांना गुन्हे शोध पथकाला दिवसा चोरी केली असल्याने अडथळे येत होते. परंतु एका कॅमेरात आरोपींतांचे स्पष्ट चेहरयांची फुटेज मिळाली होती.
सदर फुटेज च्या आधारे शोध पथकाने तांत्रिक विश्लेशनाव्दारे तसेच गोपनिय माहीतीच्या आधारे आरोपीतांची ओळख पटविली व आरोपीतांची सखोल माहीती प्राप्त केली.
आरोपी- ०१) रितेश रविंद्र नेवे वय ३१ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्याच्या मागे जळगांव तसेच ०२) गजेंद्र सोपान चौधरी वय ३८ रा ममुराबाद इंदीरानगर ईदगाह रोड ता.जि. जळगांव ह. मु. सिलवासा जि. नगर हवेली यांना दि. २१/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
आरोपीतांना सदर गुन्हयात अटक केली असुन गुन्हे शोध पथकाने आरोपीतांची सखोल चौकशी केली असता त्यातील आरोपी रितेश नेवे हा फिर्यादी यांच्या बहीणीचा मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. फिर्यादी व त्यांची बहीणी मागील काही वर्षापासुन संपर्कात नसुन फिर्यादी हया घरात एकटयाच राहत असल्याचा फायदा घेत आरोपी रितेश नेवे याने त्याच्या मित्रासह सदर घरफोडी केल्याचे कबुल केलेले आहे. जप्तमुद्येमाल - आरोपीतांना मा. न्यायालता हजर करुन त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली होती. सदर पोलिस कोठडी दरम्यान आरोपीतांकडुन गुन्हयातील ०३ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व ५०,०००/- रुपये रोख जप्त करण्यात रावेर गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
सदर कार्यवाही ही मा. श्रीकांत धिवरे सो पोलिस अधिक्षक जळगांव, मा. श्री संदीप गावीत सो अपर पो. अधिक्षक जळगांव परीमंडळ, तसेच मा. श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशन चे पो.नि. संदीप पाटील, स.पो.नि हरीदास बोचरे गुन्हे शोध पथकातील पो.कॉ. श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी, विकार शेख यांनी केली आहे. पुढील तपास सपोनि. हरीदास बोचरे हे करीत आहेत.

No comments