पी डी पाटील यांना "जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार " प्रदान ! शिक्षकदिनी जळगांव काँग्रेस भवन येथे २५ गुरुजनांना "आदर्श शि...
पी डी पाटील यांना "जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार " प्रदान !
शिक्षकदिनी जळगांव काँग्रेस भवन येथे २५ गुरुजनांना "आदर्श शिक्षक पुरस्कार " प्रदान
विकास पाटील जळगाव
(संपादक हेमकांत गायकवाड)
धरणगाव - सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक यांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधत जळगाव येथील काँग्रेस भवन येथे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी " जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.अशोक भालेराव होते. प्रमुख अतिथी म्हणून भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाचे योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, काँग्रेसचे सरचिटणीस मुक्ती हरुण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष अशोक खलाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय महाजन, विजय कोसोदे, माजी शहराध्यक्ष शामभाऊ तायडे, विजय वाणी, श्रीधर चौधरी, डॉ.एस एस राणे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, काँग्रेसचे माजी सचिव अँड सलीम पटेल, एस सी सेल अध्यक्ष अंकुश कटारे
उपस्थित होते. याप्रसंगी जळगांव जिल्ह्यातील २५ शिक्षकांना " जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. यामध्ये धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी डी पाटील यांना देखील त्यांच्या सामाजिक - शैक्षणिक कार्याची दखल घेत शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पी डी पाटील यांना यापूर्वी सामाजिक शैक्षणिक संघटनांकडून राज्यस्तरीय तीन , खान्देशस्तरीय दोन, जिल्हास्तरीय चार, तालुकास्तरीय पाच पुरस्कार तसेच तहसील कार्यालय धरणगाव यांच्याकडून पाच वेळा उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पुरस्काराने ऊर्जा मिळते आणि काम करण्याची जबाबदारी वाढते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व सामाजिक बांधिलकी जोपासणे हेच माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाबा देशमुख तर आभार सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांनी केले.

No comments