adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*मलकापूर शहर व तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घाला शेतमाल व शेती साहित्य चोरीसह घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती; धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पोलीस प्रशासनाला निवेदन*

*मलकापूर शहर व तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घाला शेतमाल व शेती साहित्य चोरीसह घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती; धर्मवीर युथ...

*मलकापूर शहर व तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घाला शेतमाल व शेती साहित्य चोरीसह घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती; धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पोलीस प्रशासनाला निवेदन*


मलकापूर प्रतिनिधी  

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


मलकापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही काळापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब समोर येत असून, शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील स्प्रिंकलर सेट, ठिबक सिंचनाचे साहित्य, विद्युत मोटारी, केबल, पाईप, शेतीची अवजारे तसेच इतर साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांवर तातडीने आळा घालण्याची मागणी धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशन व मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत पोलीस अधीक्षक, बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांना देण्यात आली आहे.निवेदनात मलकापूर शहर व तालुक्यातील अलीकडील चोरीच्या घटनांची गांभीर्याने चौकशी करून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, तपास जलदगतीने पूर्ण करावा आणि चोरीला गेलेले शेती साहित्य व इतर माल जप्त करण्यासाठी प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच चोरीच्या मालाची खरेदी-विक्री करणाऱ्या किंवा चोरीच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींचीही कायदेशीर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फाऊंडेशनने केली आहे. चोरीच्या घटना वारंवार घडणाऱ्या संवेदनशील भागांमध्ये रात्रीची गस्त, नाकाबंदी व पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, तसेच गावखेड्यांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“शेतकऱ्यांच्या कष्टाचे साहित्य चोरीला जाणार आणि चोर मोकाट फिरणार, हे आम्ही सहन करणार नाही,” अशी भूमिका धर्मवीर युथ फाऊंडेशनने मांडली आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी व निवेदनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर झालेल्या कारवाईची माहिती संबंधित तक्रारदारांना देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष चोरी प्रतिबंधक पथक किंवा विशेष मोहीम राबविण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांवर तातडीने प्रभावी कार्यवाही न झाल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन व जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

हे निवेदन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक द्वेषातून नसून शेतकरी, नागरिक आणि गावखेड्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी देण्यात येत असल्याचे फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे.मुख्य मागणी : “चोरी थांबवा – शेतकरी व नागरिकांना सुरक्षा द्या!”

No comments