फारुक सय्यद यांची तालुकाध्यक्षपदी निवड श्रीरामपूर उर्दू शिक्षक संघटनेकडून सत्कार श्रीरामपूर / प्रतिनिधी: [संपादक- हेमकांत गायकवाड] आमदार ...
फारुक सय्यद यांची तालुकाध्यक्षपदी निवड श्रीरामपूर उर्दू शिक्षक संघटनेकडून सत्कार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
[संपादक- हेमकांत गायकवाड]
आमदार किशोर (भाऊ) दराडे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री.फारुक सय्यद (सर) यांचा श्रीरामपूर उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
फारुक सय्यद सर यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय वर्तुळातूनही त्यांचे मोठे कौतुक होत आहे. या गौरव सोहळ्याप्रसंगी श्रीरामपूर तालुका शिक्षक सोसायटीचे संचालक साहेबराव रकटे (सर), प्रशांत होन (सर) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
उर्दू शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षकांनी फारुक सय्यद सरांच्या आगामी कार्यकाळाला शुभेच्छा देत हा सत्कार केला. याप्रसंगी संघटनेचे रफिक पठाण (सर), तन्वीर शेख (सर), साबीर शाह (सर), आरिफ शेख (सर), इब्राहिम बागवान (सर) आणि शेख शहजाद शब्बीर (सर) यांच्यासह अनेक शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी फारुक सय्यद (सर) यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात संघटनात्मक व राजकीय कामे अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
इब्राहीम बागवान (सर) श्रीरामपूर
----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments