सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कन्यापूजन संपन्न ! नवरात्रोत्सवानिमित्त चिमुकल्या कन्यांचा सन्मान; भक्तिमय वातावरणात कार्यक्रम य...
सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कन्यापूजन संपन्न !
नवरात्रोत्सवानिमित्त चिमुकल्या कन्यांचा सन्मान; भक्तिमय वातावरणात कार्यक्रम
यावल तालुका प्रतिनिधी
[संपादक- हेमकांत गायकवाड]
यावल : सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री .प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते कन्यांचे पूजन करून त्यांना देवीचे रूप मानत सन्मानित करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत कन्येला देवीचे स्वरूप मानले जाते. या परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांच्यामध्ये मुलींबद्दल आदर, प्रेम व सन्मानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कन्या पूजनानिमित्त मुलींना शाळेतर्फे शालेय उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या .कन्यापूजनामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीच्या महत्त्वाची सुंदर शिकवण मिळाली. शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
“कन्येचा सन्मान, हाच संस्कृतीचा अभिमान!”

No comments