adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुरली येथे जय शिवाजी दुर्गा मंडळ व प्रा.आ.केंद्र अंतुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ रक्तदात्यांचे रक्तदान

 अंतुरली येथे जय शिवाजी दुर्गा मंडळ व प्रा.आ.केंद्र अंतुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ रक्तदात्यांचे र...

 अंतुरली येथे जय शिवाजी दुर्गा मंडळ व प्रा.आ.केंद्र अंतुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ रक्तदात्यांचे रक्तदान 


​अंतुर्ली प्रतिनिधी. किरण धायले. 

[संपादक- हेमकांत गायकवाड]

अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,व जय शिवाजी दुर्गा मंडळ, अंतुरली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी  येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभला असून एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

​सदर रक्तदान शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित घडेकर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचे उत्कृष्ट आयोजन श्री मोहन बेलदार यांनी केले होते. तसेच या उपक्रमात संजीवनी ब्लड बँक टीमचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

​या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, एस.ए.भोई सर, नरेंद्र दुट्टे , शे.भैय्या शे.करीम, विलास काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील, आरोग्य सहाय्यक आनंद ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी  सुरेश चौधरी, आरोग्य सेविका अनिता पेंदूर तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

​शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांमधून श्री मोहन बेलदार, श्री अनिल वाडीले, आणि युवा आरोग्य स्वयंसेवक श्री पियूष दुट्टे,तसेच हर्षल दाणी,विशाल बेलदार,सुमित पालवे,निशांत दुट्टे जय शिवाजी दुर्गा मंडळ शिवाजीनगर मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. अंतुरली ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून सर्व उपस्थितांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

No comments