आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न! जिल्हाभरातील गुणवंत शिक्षकांचा स...
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न!
जिल्हाभरातील गुणवंत शिक्षकांचा सपत्नीक सत्कार; आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आसेमं संघटनेचे सामाजिक व शैक्षणिक कार्य गौरवास्पद — फिरोज पठाण
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम समाजाभिमुख असून, ते निश्चितच गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आसेमं संघटनेच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. यासोबतच समाजातील विविध समस्या, अडीअडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील असतात. या उपक्रमांतून समाजाप्रती असलेली संघटनेची बांधिलकी दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. संघटनेने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य व समाजसेवेचा वसा असाच पुढे सुरू ठेवावा, असे आवाहनही गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी यावेळी केले.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
आद्य क्रांतिकारी जननायक तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार निवड शिक्षक यादी
1)-मा.प्रशांत पन्नालाल आंबेकर सर, शाळा-सावखेडा ता. रावेर
2)-मा.हुसेन उघडु तडवी सर, उपशिक्षक बोरखेडा बु! ता. यावल
3)-जाबीर तडवी सर, उपशिक्षक शाळा मोहराळे ता. यावल
4)-मा.श्रीमती. आशा रमेश चांदसरे,जि. प. शाळा -बिडगाव ता. चोपडा
5)-मा. मिनाताई राजु तडवी जि. प. शाळा-अंधारमळी ता. रावेर
6)-सौ. गुंजन सुयोग पाटील जि. प. शाळा-आंदलवाडी ता.रावेर
7)-मा.श्री. अरुण सुरेश चौधरी जि. प. शाळा-पानशेवडी ता. चोपडा
8)-मा. श्री. अरूण शंकर झनके ग्रे.मु.जि. प. शाळा-जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर
9)-मा. अजित महारू तडवी ग्रे. मु. जि. प. शाळा-नांद्रा हवेली ता. जामनेर
10)-मा. रविंद्र तुकाराम कुमावत सर,मुख्याध्यापक आश्रम शाळा-मोहमांडली ता. रावेर
जळगांव जिल्ह्यातील दहा शिक्षक शिक्षीका यांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या कार्याचा सन्मान केल्याने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड, आत्मविश्वास आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा निर्माण होते. या उद्देशाने आसेमं संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमातून शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा सन्मान करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आसेमं परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती
या सोहळ्याला आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी, प्रदेशाध्यक्ष कामील तडवी, कर्मचारी इरफान तडवी सर, मोहम्मद फकिरा तडवी, अनिल नजीर तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक अली खाँ तडवी, सलीम तडवी सर, अलीशान तडवी, अशरफ तडवी, विनोद तडवी, सत्तार तडवी, नसीम तडवी, जुम्मा तडवी, रोशन तडवी आदींसह आसेमं महापरिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिक्षकवृंद, पुरस्कारार्थी शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा गौरव अशा दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उत्साहात पार पडला.
आद्य क्रांतिकारी जननायक तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार निवड शिक्षक यादी
1)-मा.प्रशांत पन्नालाल आंबेकर सर, शाळा-सावखेडा ता. रावेर
2)-मा.हुसेन उघडु तडवी सर, उपशिक्षक बोरखेडा बु! ता. यावल
3)-जाबीर तडवी सर, उपशिक्षक शाळा मोहराळे ता. यावल
4)-मा.श्रीमती. आशा रमेश चांदसरे,जि. प. शाळा -बिडगाव ता. चोपडा
5)-मा. मिनाताई राजु तडवी जि. प. शाळा-अंधारमळी ता. रावेर
6)-सौ. गुंजन सुयोग पाटील जि. प. शाळा-आंदलवाडी ता.रावेर
7)-मा.श्री. अरुण सुरेश चौधरी जि. प. शाळा-पानशेवडी ता. चोपडा
8)-मा. श्री. अरूण शंकर झनके ग्रे.मु.जि. प. शाळा-जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर
9)-मा. अजित महारू तडवी ग्रे. मु. जि. प. शाळा-नांद्रा हवेली ता.जामनेर
10)-मा. रविंद्र तुकाराम कुमावत सर,मुख्याध्यापक आश्रम शाळा-मोहमांडली ता.रावेर


No comments