मुक्ताईनगर येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता सप्ताह उत्साहात साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी, [संपादक - हेमकांत गायकवाड] मुक्ताईनगर, दि. ८ ऑक्...
मुक्ताईनगर येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता सप्ताह उत्साहात साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी,
[संपादक - हेमकांत गायकवाड]
मुक्ताईनगर, दि. ८ ऑक्टोबर २०२६: जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर यांच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर पासून स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सुरुवात गांधी जयंती दिनी स्वच्छता शपथेने झाली. सप्ताहभर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
या सप्ताहात खालील कार्यक्रम घेण्यात आले:
१. ई-कचरा जनजागृती रॅली: विद्यार्थ्यांनी घरातील व शाळेतील खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करून ई-कचऱ्याच्या धोक्याबाबत जनजागृती केली.
२. शालेय परिसर स्वच्छता जनजागृती: विद्यार्थ्यांनी रस्ते, शालेय परिसर व सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबविली.
३. वृक्षारोपण कार्यक्रम: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
४. पाणी बचत मार्गदर्शन: पाण्याचे महत्त्व व बचतीचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले.
५. हात स्वच्छ धुणे व आरोग्य मार्गदर्शन: वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
६. आनंददायी शनिवार: विविध खेळ व उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यात आले.
या संपूर्ण सप्ताहात विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'स्वच्छ भारत - स्वस्थ भारत' या गांधीजींच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.सदर सप्ताहाचे आयोजन मा. प्राचार्य व्ही.एम.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.

No comments