adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पर्यावरण संवर्धनासाठी जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे ई-कचरा जनजागृती रॅली

 पर्यावरण संवर्धनासाठी जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे ई-कचरा जनजागृती रॅली   मुक्ताईनगर प्रतिनिधी, [संपादक - हेमकांत गायकवाड] मुक्ताईनगर, दि. ...

 पर्यावरण संवर्धनासाठी जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे ई-कचरा जनजागृती रॅली  



मुक्ताईनगर प्रतिनिधी,

[संपादक - हेमकांत गायकवाड]

मुक्ताईनगर, दि. ०७ ऑक्टोबर २०२६:  जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे पर्यावरण संवर्धन संदर्भात ई-कचरा  संकलन  आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे आयोजन श्री. एस.बी. वंजारी सर यांनी केले असून विद्यार्थ्यांनी खराब झालेले इलेक्ट्रॉनिक साहित्य, मॉनिटर, पंखे, वायर,  गोळा करून ई-कचरा जनजागृतीचा संदेश दिला. याप्रसंगी मा. प्राचार्य व्ही.एम. चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ई-कचऱ्यामुळे पर्यावरणाला होणारे धोके, मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. 'ई-कचरा व्यवस्थापन - पर्यावरण संवर्धन काळाची गरज' हा संदेश देत विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रसंगी सदर इयत्ता 6 वी चे विद्यार्थी ,शिक्षक सहभागी होते.

No comments