माणुसकीच्या सेवेला सलाम! गौसेवक समाजसेवक सुरजभैय्या यादव यांचा जिल्हास्तरीय गौरव पल्लवी पाटील खामगाव [संपादक - हेमकांत गायकवाड] खामगाव :-...
माणुसकीच्या सेवेला सलाम! गौसेवक समाजसेवक सुरजभैय्या यादव यांचा जिल्हास्तरीय गौरव
पल्लवी पाटील खामगाव
[संपादक - हेमकांत गायकवाड]
खामगाव :- आसलगाव ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात दि. 11/10/2026 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळा व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी गेल्या 14 वर्षांपासून संपूर्ण भारतात सेवा कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारे, कुठल्याही राजकीय पक्षापासून दूर राहून निःस्वार्थ गौ सेवा, रक्तसेवा, रुग्णसेवा व सामाजिक कार्य करणारे, एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रक्तमित्र गौ सेवक सुरजभैय्या यादव यांचा जिल्हा स्तरावर सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू घाटे (पाटील) म्हणाले, "सुरजभैय्या यादव हे प्रसिद्धीसाठी नाही तर प्राणीमात्रांच्या वेदनांसाठी जगतात, म्हणूनच त्यांनी केलेल्या सेवा कार्याची ओळख आज संपूर्ण भारतात आहे."
या सोहळ्यास तहसीलदार पवन पाटील, कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी सुधाकर वायाळ यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments