adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चहार्डीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा चित्रकला व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

चहार्डीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा चित्रकला व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन  चोपडा तालुका प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चहार्डी ता. ...

चहार्डीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

चित्रकला व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन 



चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चहार्डी ता. चोपडा -येथील भाऊसाहेब शामराव पाटील विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य तथा सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक सी.बी. पाटील होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यरपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी ग्रंथ व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ.जी .टी. पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले .विद्यार्थ्यांनी चित्र कला व ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला .विद्यार्थ्यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर भाषणे दिली .उत्कृष्ट चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली .माजी मुख्याध्यापक व्हि.आर. सोनवणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, डॉ. जी.टी. पाटील सेवानिवृत्त शिक्षक सुधीर पाटील, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्रीराम महाजन, दगडू पाटील, मुख्याध्यापक शरद जगताप ,उप मुख्याध्यापक पी. बी. पाटील, पर्यवेक्षक जे.डी. सोनवणे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख एस.डी. शिरसाठ यांनी केले. चित्र व ग्रंथ प्रदर्शनासाठी संदीप पाटील ,चित्रकला शिक्षिका शितल पाटील , एन.डी. पवार यांनी परिश्रम घेतले.

No comments